Friday, 27 May 2011

    मी कालचा सामना पाहिला , गेलच्या आक्रमणापुढे मुंबई हतबल झाली.माझ्या मते अबू नेचीमला पहिले षटक देणे ही मुंबईची सर्वात मोठी चूक झाली , गेलसारख्या अनुभवी आणि विस्फोटक फलंदाजापुढे नेचीम्सारख्या अननुभवी गोलंदाजाला गोलंदाजी देणे म्हणजे आपल्या पायावर धोंडा मारण्यासारखे आहे. आधी वाटत होते की खेळपट्टी चांगली आहे त्याच्यामुळे धावा होत आहेत पण गेलचा बळी गेल्यानंतर कळून आले की खेळपट्टी एवढी चांगली नव्हती गेलच चांगला खेळत होता.
 
   पण या सामन्यातून पुन्हा एकदा दिसून आले की बंगलोरची फलंदाजी गेलवर किती अवलंबून आहे , गेलच्या ४७ चेंडूतील ८९ धावा सोडल्या व १४ अवांतर धावा सोडल्या तर बाकीच्यांनी ७३ चेंडूत फक्त ८२ धावा केल्या आहेत , माझ्या मते बंगलोरचा संघ म्हणजे 'One Man Show' आहे , त्यांची बोलिंग एवढा प्रभाव पाडत नाही पण गेलमुळे त्यांच्या बाकीच्या कमकुवत बाजू झाकल्या जातात.

   चेन्नईसाठी गेलची विकेट महत्वाची असेल यात काही शंकाच नाही , गेल मंद गतीच्या गोल्न्दाजापुढे चकतो हे चेन्नईला चांगलेच माहित आहे त्याच्यामुळे धोनी अश्विन कडून  पुन्हा गेलची विकेट घेण्याचा प्रयत्न करेल. चेन्नई कडे चांगली फलंदाजी व गोलंदाजी आहे गरज आहे फक्त शांतपणे खेळण्याची आणि सातत्य  राखण्याची.     

                                   www.iplt20.com/pulse

No comments:

Post a Comment